शिक्रापूर,पुणे : शिक्रापूर ते मलठण रस्त्याची दुरावस्था; अनेक ठिकाणी साईडपट्ट्या खोल असल्याने अपघाताची शक्यता,तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

669
         शिक्रापूर,पुणे : शिक्रापूर ते मलठण या रस्त्याची खूपच दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी साईड पट्या खराब अवस्थेत आहेत. संबंधित विभागाने मुरुम टाकुन साईड पट्या भराव्यात अशी मागणी होत आहे. हा रस्ता अरुंद असल्याने एकाच वेळी दोन वाहने देखील जाऊ शकत नाहीत.या मार्गावर उसाची वाहतुक मोठ्या प्रमाणात सूरु आहे. तरी संबधित खात्याने याबाबींकडे गांभीर्याने दखल घ्यावी अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.
 खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा आहे तेच समजत नाही. शाळकरी मुले, पदाचारी यांना त्याचा खुप ञास होत आहे.या रस्त्यावर दिवसोंदिवस वर्दळ वाढत आहे संबंधित खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक,शाळकरी मुले यांच्या वतीने करण्यात आली आहे.
 – प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *