प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर महिलांना व्यवसायात ही हमखास यश – दिपालीताई  शेळके

503

   शिक्रापूर ता. शिरुर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,सा.समाजशील) – महिलांनी जिद्द,चिकाटी व अखंड मेहनत घेतल्यास प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कुठल्याही व्यवसायात त्यांना हमखास यश प्राप्त होते असे प्रतिपादन यशस्विनी महिला अभियानाच्या शिरूर तालुका समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्त्या दिपालीताई शेळके यांनी केले. त्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूरच्या मनिषा विहार सोसायटी (मलठण फाटा ) येथे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात हळदी कुंकूवाच्या  कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

यावेळी परिसरातील सुमारे  १०० महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आयोजन शिरुर ता.काँग्रेस (आय) च्या महिला अध्यक्षा अरुणा मोहोळ,शिल्पा,राणी भुजबळ व सोसायटीतील इतर महिलानी केले होते.यावेळी पंचायत समितीच्या सभापती मोनिका हारगुडे, शिक्रापूरच्या सरपंच जयश्री भुजबळ, माजी सरपंच अंजना भुजबळ,पाठेठाणच्या उपसरपंच अश्विनी हंबीर,युवती काँग्रेस शिरुरच्या अध्यक्षा शितल आंनदे, वंदना पोतदार, शिक्रापूर ग्रा.प सदस्या रोहिणी गिलबिले, नाट्य परिषदेच्या सदस्या सविता गायकवाड,सुनिता सायकर,रयत क्रांती संघटनेच्या अध्यक्षा सीमा पवार,कमल लोखंडे उपस्थित होत्या.यावेळी जि.प.सदस्या रेखा बांदल कुसुम मांढरे,यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शेळके म्हणाल्या कि, विविध क्षेत्रातील व्यवसायात अनेक महिलांनी चिकाटी व  जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश संपादित केले आहे.आज ही अनेक मी,महिलांमध्ये व्यवसायातून उभारी घेण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे परंतु त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी संक्रातीच वाण म्हणून महिलांना वस्तु भेट देण्यात आल्या. अन्नदान,वस्ञदान,गोरगरीबांना योग्य ती मदत,आरोग्य विषयक असे सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. तर पंचायत समितीच्या माध्यमातुन महिलांना योग्य ते सहकार्य करु असे आश्वासन शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हारगुडे यांनी दिले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *