श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कुल मधील विद्यार्थ्यांचे शालेय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये घवघवीत यश

190

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुकास्तरीय शालेय शिक्षण विभागांतर्गत तायक्वांदो स्पर्धा अमृतवेल ग्लोबल स्कुल येथे संपन्न झाल्या. यामध्ये श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कुल शिक्रापूर येथील विद्यार्थ्यांनी अनेक पदके जिंकून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यामध्ये 14 वर्षाखालील मुलांमध्ये अनिकेत चौगुले- सुवर्णपदक,साहिल खान-रजतपदक व गौरव जुंबाड याने कांस्यपदक पटकावले. तर 14 वर्षाखालील मुलींमध्ये भक्ती भोईर- सुवर्णपदक,गार्गी खांडेकर – सुवर्णपदक,विशाखा सायकर-  रजतपदक व संजना मामीला हिने कांस्यपदक पटकावले. 17 वर्षाखालील मुलांमध्ये रुद्र दिघे-सुवर्णपदक,हर्ष किर्हे सुवर्णपदक व अनुज शहाणे याने कांस्यपदक पटकावले व 17 वर्षाखालील मुलींमध्ये कार्तिकी तावडे-रजतपदक,अनुष्का सपकाळ हिने कांस्यपदक पटकावले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक विशाल गुजर,स्वप्नील भिसे यांचे संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ सायकर, चेअरमन मनीषा सायकर, विश्वस्त बाबुराव साकोरे, अक्षय गायकवाड, विश्वस्त सुरेश शिंदे, सर्व विश्वस्त सपना सायकर, निखिल वाव्हळ,अजिंक्य गायकवाड, महेंद्र पटेल, शीतल सायकर, नवनाथ वाव्हळ या सर्वांनी अभिनंदन केले. प्राचार्य गौरव खुटाळ, उप-प्राचार्या उज्ज्वला दौडकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक या सर्वांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *