मराठी पत्रकार परिषदेचे पिंपरी चिंचवड येथे उत्साहात उद्घाटन

237

ज्याच्या बातमीत असते धार, जो कधीच मानत नाही हार, जो शब्दांनी करतो वार, तोच खरा पत्रकार – केंद्रिय मंत्री रामदास आठवले

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उदघाटन जेष्ठ पत्रकार व मा .खासदार कुमार केतकर व केंद्रिय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते करणेत आले. थेरगाव येथील कै शंकरराव गावडे सभागृहात पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, जिल्हा पत्रकार संघाचे आयोजनातून साकारलेल्या या अधिवेशनास राज्यातील कानाकोपऱ्यांतून दोन हजारावर प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडीयाचे पत्रकार उपस्थित होते. दिपप्रज्वलाने कार्यक्रमाचे उदघाटन करून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष माधुरी कोराड, सोशल मिडीया अध्यक्ष सुरज साळवे, अविनाश आदक व पदाधिकाऱ्यांचे हस्ते पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देवून कुमार केतकर व मान्यवरांचा सत्कार करणेत आला. बाळासो ढसाळ यांनी स्वागत व किरण नाईक यांनी प्रास्तवना केली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या ढंगदार शैलीत, जो शब्दांनी करतो वार – ज्याच्य बातमीत असते धार – जो कधीच मानत नाही हार , असा यमक साधत पत्रकारांमुळेच मी दिल्लीत पोचलो हे मान्य करत त्यांच्या समस्या मुख्यमंत्री व पंतप्रधान  यांचेकडे मांडून सोडवण्याचा प्रयत्न करू सांगून शेवटी ‘ जयः भिम – जय पत्रकार ! ‘ असा शेवट केला. याप्रसंगी आयुक्त श्री शेखर सिंह यांनी या भव्य हॉलचे उद्घाटन या कार्यक्रमाने झाल्यामुळे आनंद व्यक्त केला व सहकार्याची भावना दाखवली. नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्र्या मार्फत पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचे सुतोवाच केले . शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पाबळे व वडघुले हे शिरूर तालुक्यातून अध्यक्ष पदापर्यंत पोचल्याने पत्रकार भवनासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी भविष्यात पत्रकारांचे प्रश्नासाठी जोमाने कार्यरत होवून सर्वांच्या एकजुटीतून चांगले काम करू, असे सुतोवाच केले. खा. कुमार केतकर यांनी पत्रकारांचे प्रश्न सगळ्यांच देशात असून आपल्या ग्रामीण भागातील प्रतिनीधींचे प्रश्न अधिक गंभीर पणे घेण्याची आवश्यकता मांडली. यावेळी अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर , महिला आघाडी अध्यक्ष शोभा जयपुरकर, सचिव अरुण कांबळे, डिजीटल मिडीया अध्यक्ष अनिल वाघमारे, राजु पाटुदकर व कार्यालयाचे बबन झिंजुर्डे यांचा सत्कार झाला यावेळी पिंपरी चिंचवड पञकार संघाच्या उपाध्यक्षामाधुरी कोराड याच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व शिरुर तालुक्यातील संजय बारहाते यांच्या सहपदाधिकारी उपस्थित होते. स्मरणीका, वागयज्ञ पुस्तक ,ऍपचेही मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. विशेष पुरस्कार व रोख रक्कम ९४ व्या वर्षी जेष्ठ पत्रकार श्री हेमंत जोगदेव यांना प्रदान करणेत आला. मा.खा.कुमार केतकर भव्य दिव्य उत्कृष्ट नियोजन केल्याने पिं.चि . पत्रकार संघ व आयोजकांचे कौतुक केले. तर आभार पिंपरी चिंचवड पञकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी मानले.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *