शिरूर तालुक्याला दिलासा -ओमायक्रॉनचे रुग्ण नाहीत – कोरोना रुग्ण संख्या ही आटोक्यात – डॉ. दामोदर मोरे यांची माहिती 

256
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – देशासह राज्यभरात ओमायक्रॉन,कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना शिरूर तालुक्यास सध्या मात्र मोठा दिलासा मिळत आहे. तालुक्यात ओमायक्रॉनचा एका ही रुग्ण नसून कोरोना रुग्ण संख्या ही ५६ इतकी आटोक्यात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
         असे असले तरी तालुक्यातील नागरिकांनी या संसर्गापासून संरक्षण व्हावे म्हणून प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, ओमायक्रॉन वेगाने पसरत असल्याने नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत,मास्क,सॅनिटायझरचा वापर करावा,हात नियमित स्वच्छ धुवावेत.तसेच लक्षणे जाणवल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तात्काळ योग्य ते उपचार घ्यावेत असे आवाहन ही डॉ.मोरे यांनी केले आहे.
        तालुक्यातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांसाठी उद्या दि. ०३ पासून लसीकरण अभियान सुरु होत असून दि. २ जानेवारी २००७ पूर्वी जन्मलेल्या या वयोगटातील सर्वांना लसीकरण करण्यात येणार असून त्याकरिता अत्यावश्यक असणारी कोवॅक्सीन लस योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. या वयोगटातील लाभार्थींनी नजीक च्या आरोग्य केंद्रात जाऊन ही लस घ्यावी. तसेच ९ वी  ते १२ वी  पर्यंतच्या विद्यार्थ्याचे त्या त्या विद्यालयाशी संपर्क साधून लसीकरण शाळेत जाऊन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील नागरिकांनी आपले आरोग्य सुदृढ राहावे.,संसर्गापासून संरक्षण व्हावे म्हणून अत्यावश्यक व योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही डॉ. दामोदर मोरे यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *