शिक्रापूर,पुणे : कोरेगाव भिमाचा माजी उपसरपंच गणेश फडतरेवर स्थानबद्धचे आदेश,एमपीडीए अंतर्गत जिल्हाधिकारीयांचा गणेश फडतरे यास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश

1250

         शिक्रापूर,पुणे : कोरेगाव भिमा ता. शिरुर येथे झालेल्या दंगलीमध्ये आरोपी असलेले कोरेगाव भिमाचे माजी उपसरपंच गणेश फडतरे वय २८ यांच्यावर एमपीडीए अर्थात महाराष्ट्र झोपडपट्टी दांडा कायदा अंतर्गत कारवाई करत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहीती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

          कोरेगाव भिमा ता. शिरूर येथे एक जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीमध्ये मुख्य आरोपी असलेला कोरेगाव भिमाचा माजी उपसरपंच गणेश भाऊसाहेब फडतरे याने सदर गुन्ह्यातून जामीनावर मुक्तता होताच कोरेगाव भीमा येथे हत्याराने मारहाण केल्याचे दोन गंभीर गुन्हे केले. त्यांनतर त्याची दहशत वाढत गेली. त्याची दहशत वाढत असताना शिक्रापूर पोलिसांनी त्याला अटक केली.फडतरे हा एका गुन्ह्याच्या प्रकरणी येरवडा कारागृहात आहे. तर पुणे  जिल्हयातील ग्रामिण भागात सराईत गुन्हेगारांची  वाढत चाललेली दहशत मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यावेळी शिक्रापूर पोलिसांनी देखील शिक्रापूर पोलीस ठाण्यात फडतरे याच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचे पाच गुन्हे, या शिवाय गर्दी, मारामारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर वाळू तस्करी करणे व अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हे,शिक्रापूर परीसरातील कंपन्यांना खंडणी मागणे,औद्योगिक ठेक्यासाठी कंपनीत मारहाण करणे अशा स्वरूपाच्या दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती देत गणेश फडतरे याचे विरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दौंड व पोलीस अधीक्षक कार्यालय मार्फत पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला त्यांनतर पुणे जिल्हाधिकारी यांनी गणेश फडतरे यास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यांनतर लगेचच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी येरवडा कारागृहात जात त्या आदेशाची बजावणी केली आहे. तर याबाबत बोलताना ग्रामीण भागातील गुंडांना आळा बसावा यासाठी या पुढे देखील अशा स्वरूपाच्या कारवाया सुरू राहणार असून तसेच नागरीकांनी देखील न घाबरता सराईत गुन्हेगारां विरोधात तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

– प्रतिनिधी,शेरखान शेख,(सा.समाजाशील,शिक्रापूर)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *