मुरबाड,ठाणे : तालुक्यातील दुर्गम भागातील वाघाची वाडी येथिल ग्रामस्थांचे शाळेसाठी आदर्शवत योगदान,मुलांच्या शैक्षणिक सुविधासाठी लोकसहभागातून शाळेला मदत

456

मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा आज नावारुपाला येत असुन शैक्षणिक  गुणवत्ते सोबत डिजीटल शाळा  ,विद्यार्थ्याना  योग्य दिशा या साठी  ग्रामस्थ हि पुढे येताना दिसत असुनआहेत.  तालुक्यातील वाघाची वाडी येथिल ग्रामस्थानी  शाळेसाठी आपले कर्तृत्व व दार्तृत्वाचे  नवे उदाहरण समोर ठेवले आहे .

  

वाघाचीवाडी ग्रामस्थांनी जे उदाहरण ईतंरापुढे  ठेवले आहे ते वाखण्याजोगे आहे आज सर्वत्रच जागेच्या किमती गगनाला भिडत असताना शाळेसाठी मंजुर झालेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी जागा मालकाने विनामुल्य हवी तेवढी जागा घ्या हे सांगुन शाळे विषयी असलेल्या  दार्तृत्वाची  ओळख  करुन दिली. त्यामुळे शाळेला प्रशस्त संरक्षण भिंत तयार झाली तर दुसरी बाब म्हणजे अगदी सहा दिवसापूर्वी ग्रामस्थांनी ठरवले की, शाळेसमोरील मोकळया मैदानात लॉन ( हिरवळ) टाकायची.

मग  सर्वजण कामाला लागले, कोणी मोफत लाल माती दिली, कोणी ट्रॅक्टर मोफत दिला.कोणी गांडूळखत दिले. व सर्वानी मैदान सपाट केले.त्यात महिलांचा सहभाग खूप मोठा होता.यातुन गावकऱ्याची शाळेविषयीची आदर्श प्रेरणा,तळमळ दिसुन आली. तर दोनच दिवसात ग्रामस्थानी शालेय व्यवस्थापन समितीला रोख १४०००/- रुपये दिले. यावर त्यांना विचारले असता हे लगेचच शक्य कसे झाले ? यावर ग्रामस्थ म्हणाले “गुरूजी,शाळा ही आपली आहे.  आम्ही गावात सभा घेतली व त्यानंतर लगेच दोनच दिवसात आम्ही सर्वानी पैसे जमा केले. तर ग्रामस्थानी  लॉनची लागवड करुन शाळेचे सुशोभिकरण करुन नवा आदर्श निर्माण केला.

– प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *