शिक्रापूर परिसरात साविञीबाई फुले जयंती मोठ्या प्रमाणात साजरी

231

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापुर ग्रामपंचायतमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच जागतीक महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या सर्व महिला पोलिस, महिला शिक्षिका, शिक्रापूर आरोग्य उपकेंद्रचे महिला डॉक्टर तसेच सर्व आशा वर्कर, शिक्रापूर येथील महिला पोस्टमन, शिक्रापूर महीला तलाठी, शिरूर तालुक्याच्या तहसीलदार यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. त्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्या कुसूमताई मांढरे, पंचायत समिती सदस्या जयमाला जकाते ताई, माजी ग्रामपंचायत सदस्या मिनाताई सोंडे, संगीताताई थोरात, सीमा कळमकर, त्रिनयन कळमकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आयोजन नीषाताई गडदे, विद्यमान ग्रामपंचायत महिला सदस्या सरिकाताई सासवडे, मोहिनीताई मांढरे, उषाताई राऊत, शालिनीताई राऊत, सीमाताई लांडे, वंदनाताई भुजबळ, कविताताई टेमगिरे, पुजाताई भुजबळ, मोहिनी ताई, युवराज मांढरे यांनी केले होते.कार्यक्रमाची प्रस्तावना पुजा दिपक भुजबळ यांनी केले तर आभार सारिका ताई सासवडे यांनी केले. याचबरोबर सरकारी आरोग्य केंद्र, विद्याधाम प्रशाला, सायकर मळा येथील सिध्दीविनायक स्कुल येथे ही जयंती साजरी करण्यात आली. आरोग्य केंद्रात जि.प.सदस्या कुसुमताई मांढरे, सरपंच रमेश गडदे, प्रकाश वाबळे, कृष्णा सासवडे, डॉ काशिद व त्याचा वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होते. फुले यांच्या जंयतीचे औचित्य साधुन १५ वर्षापुढील मुलांना लसीकरण सुरु करण्यात आले. विद्याधाम प्रशाला शिक्रापूरमध्ये प्राचार्य रामदास चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व नंतर कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सायकर मळा येथे मनिषा सायकर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *