पुणे : आयसीएआय’तर्फे ‘जीएसटी व रेरा’ यावर एकदिवसीय ‘ज्ञानसंगम 2018’ परिसंवादाचे आयोजन

931

      पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीसीआय) पुणे विभाग व दि वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशर्न्स असोसिएशन (डब्ल्यूएमटीपीए) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ’जीएसटी आणि रेरा’ या विषयावर एक दिवसाच्या ‘ज्ञानसंगम 2018’ या परिसंवादाचे आयोजन केले आहे, अशी माहिती आयसीएआय पुणेच्या उपाध्यक्षा व ‘ज्ञानसंगम-2018’च्या प्रमुख समन्वयक सीए ऋता चितळे, ‘डब्ल्यूएमटीपीए’चे माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. प्रसंगी ‘डब्ल्यूएमटीपीए’चे सचिव शरद सूर्यवंशी व उपाध्यक्ष मनोज चितळीकर उपस्थित होते.

ऋता चितळे म्हणाल्या, “सोमवार, दि. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हॉटेल शेरेटॉन ग्रँड, पुणे स्टेशनजवळ येथे हा परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचे उद्घाटन जीएसटीचे राज्याचे आयुक्त राजीव जलोटा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ‘जीएसटी आणि रेरा’ या कायद्यांतर्गत झालेल्या बदलांविषयी कर सल्लागार सीए बिमल जैन, ऍड. रतन सामळ हे मार्गदर्शन करणार आहेत. सीए आणि कर सल्लागार यांच्यासाठी श्री ज्ञांनवच्छल स्वामी तणावमुक्तीवर बोलणार आहेत.”

            या परिषदेत वस्तू व सेवा कर आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) या कायद्यावर चर्चा केली जाणार आहे. या परिषदेत वस्तू व सेवा कर आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) या कायद्यावर चर्चा केली जाणार आहे. पुण्यातील दोन अग्रगण्य संस्था प्रथमच एकत्र आल्या असून कर सल्लागार सभासदांना या संगमातून ज्ञानार्जन करण्याची उत्तम संधी मिळणार आहे, असे नरेंद्र सोनावणे यांनी नमूद केले.
         तसेच या कार्यशाळेमध्ये जीएसटी व रेरा यासंदर्भातील नवीन कायदे समज गैरसमज, यादरम्यान येणारा मानसिक ताणतणाव व या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींचे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी puneicai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *