मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील जागे आभावी प्रलंबित कब्रस्थान व स्मशानभुमी चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार – आमदार किसन कथोरे

577
            मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील जागे अभावी प्रलंबित राहिलेल्या कब्रस्तान व स्मशानभुमीचा  प्रश्न लवकरच मार्गी लागणार अशी ग्वाही आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड येथील तहसिलदार कार्यालयात झालेल्या नियोजन बैठकीत दिली.
            गेली 35 वर्ष कब्रस्तान व स्मशान  भुमिचे प्रश्न कोणीही मार्गी लावण्यासाठी साधी चर्चाही केली नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. मृत्यू नंतरही त्याची परफट  होऊ नये या साठी जातीभेद मनात न ठेवता हा प्रश्न मार्गी लागला पाहीजे अशी  संकल्पना आमदार कथोरे   यानी मांडली. या साठी महसूल विभाग,वनविभाग, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक व कब्रस्तान व स्मशान भूमि  प्रलंबित असलेल्या गावातील ग्रामस्थांची एक बैठक तहसिलदार सचिन चौधर यांनी आयोजित केली होती.
            या वेळी तहसिलदार सचिन चौधर, उपमूख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डी वाय जाधव, निवासी नायब तहसिलदार हनुमंत जगताप, जि.प सदस्य सुभाष घरत,लियाकत शेख, नायब तहसीलदार जाधव, गटविकास अधिकारी दोडके, सह बिडीओ अवचर प.स सभापती जनार्दन पादीर, उपसभापती सीमा घरत,माजी .नगराध्यक्ष मोहन सासे, दिपक पवार,अनिल घरत उपस्थीत होते.
           मुरबाड तालुक्यात एकूण 125 ग्रामपंचायती आहेत.त्या पैकी  78 ग्रामपंचायतींना स्वताची जागा नसल्याने कब्रस्तान, दफनभूमी, स्मशान भूमि चा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावात या  प्रश्नावरून वादही झाले आहेत. मात्र जात-पात याचा विचार न करणारे आमदार कथोरे यांनी जागा नसलेल्या ग्रामपंचायतिंना वनखात्याच्या जागा नियमात बसून जनसूविधा योजने अंतर्गत हा प्रश्न सोडविशाचा निर्णय घेतल्याने सर्वच समाजातून समाधान व्यक्त केला जात आहे. प्रलंबित ग्रामपंचायतीने सोमवार दि.15 ऑक्टोबर पर्यंत 3/2 चा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या असून या कामात चालढकल करणा-या ग्रामसेवकांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशाराही या बैठकीत देण्यात आला.
          या बैठकीचे प्रास्ताविक तहसीलदार चौधर यांनी केले तर सुत्रसंचालन नायब तहसीलदार हनुमंत जगताप यांनी केले. तालुक्यात एकही ग्रामपंचायत कब्रस्तान, स्मशान भूमि, दभनभूमी पासून वंचित राहू नये. निधीची कमतरता नसल्याने एकाही ग्रामपंचायतीच्या हद्दीत पत्र्याची शेड असलेल्या स्मशानभूमि मला अपेक्षित नाही. त्या आर सी सी च्या व्हाव्यात असी माझी मनापासून इच्छा असल्याने एकाही अधिका-यानी पत्र्याची स्मशान भूमि चा प्रस्ताव करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *