कमी उंचीच्या दुभाजकामुळे अपघाताचे प्रमाण वाढले ; दुभाजकाची दुरुस्ती होणे गरजेचे -नागरिकांची मागणी

339

शिक्रापूर, ता. शिरुर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : पुणे-नगर राज्य मार्गावर काही ठिकाणी कमी उंचीच्या दुभाजकामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असुन त्वरित दुभाजकाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. काही ठिकाणाचे दुभाजक हे डांबरी सडकच्या बरोबरीने झाले आहे.आतापर्यंत या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात झाले आहे.  कमी उंचीच्या दुभाजकामुळे एका बाजूच्या गाडी हि दुसऱ्या बाजूला जाऊन अनेक अपघात झाले आहे. वाघोलीतील दुभाजक वगळता बाकी दुभाजकाची अवस्था आतिशय दयनीय आहे. राञीच्या वेळी वाहान चालकांना वाहाने चालवताना गाड्याचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडातो. तसेच काही ठिकाणी व्यवसायिकांनी आपल्या सोयीसाठी दुभाजक फोडले आहे. तेही बुजवण्याची मागणी नागरिक करत आहे. लोणीकंद, कोरेगाव भिमा, सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापूरी रांजणगाव गणपती  शिरुर या ठिकाणी अत्यंत कमी उंचीचे दुभाजक असुन दिवसें दिवस अपघात वाढत आहे. याबाबत नागरीकांनी वारंवार तक्रारी करुनही संबधित विभाग कानाडोळा करत आहे. ज्या ठिकाणी अनाधिकृत दुभाजक तोडले तेथे केवळ सिंमेट विटांनी  दुभाजक बुजावले आहे. ते सिमेंट काँक्रीट मध्ये होणे गरजेचे आहे. दुभाजकाची उंची अंत्यत कमी असल्याने वेगाने असलेले वाहन नियंत्रण सुटुन सहज दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर असलेल्या वाहनावर धडकल्याच्या अनेक घटना या मार्गावर झालेल्या आहे. तरी संबधित विभागाने याकडे लक्ष देऊन समस्या सोडव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *