दोंडाईचात उपजिल्हा रुग्णालय तर्फे जागतिक कर्करोग दिवस साजरा

480
दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी,समाधान ठाकरे) : उपजिल्हा रुग्णालय तर्फे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत  4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी घेण्यात आलेल्या मौखिक आरोग्य शिबिरात, एकूण 350 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार चंद्रे, योगेश पवार,धीरज दोडे, विजय पाटील, योगेश पटेल व सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व रुग्णालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेतला. डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी मौखिक, स्तन आणि गर्भाशय कर्क रोगाबद्दल थोडक्यात पण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच या कर्करोग सप्ताह मध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी तपासणी करून घ्यावी असे सुचवले. कर्क रोगाची सुरुवातीची लक्षणे सांगताना संडास व लघवीच्या सवयीत बदल, जखम लवकर बरी न होणे असामान्य रक्तसराव, गिळन्यास त्रास, अपचन, सारखा खोकला व आवाज घोगरा होणे. मौखिक कर्क रोगाची सुरुवातीची लक्षणे सांगताना, तोंडात लाल किंवा पानडरा चट्टा, व्रण, खडखडीत भाग, तोंडातील गुलाबी भाग फिका होणे, पूर्ण तोंड न उघडने, तिखट खाण्यास त्रास आणि आवाजात बदल होणे. स्तन कर्करोग बद्दल, स्तन आकारात बदल, सूज, स्तन बोन्डे  वर पुरळ, गाठ, रक्त निघणे, सारख्या स्तन वेदना. तसेच, गर्भशयाच्या कर्करोग बद्दल, रजो निवृत्ती पश्चात, समागम नंतर, दोन पाळी दरम्यान रक्त जाणे, योनीतुन दुर्गंधी येणे, श्वेतपदर, खूप जास्त अंगावरून जाणे तसेच ओटीपोटाच्या खाली दुखणे याप्रकारे  डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी सर्वाना वरील लक्षणे दिसताच त्वरित मेमोग्राफि, फाईन नीड्ल चाचणी व हिस्टॉपेथोलोजी चाचणी, शासकीय रुग्णालय मध्ये करून, त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावा अशी कळकळीची विनंती केली व आपल्या आरोग्याचे जतन करण्याचे विनम्र आवाहन केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *