विद्या धाम प्रशालेत पंचवीस वर्षातुन भरली पुन्हा शाळा

640

शिक्रापूर, ता. शिरुर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : विद्या धाम प्रशाला शिक्रापुर येथे 10 वी बॅच 1995 च्या विद्यार्थी आणि विद्यार्थीणी यांच्या बॅचला या वर्षी पंचवीस वर्ष पुर्ण झाल्याबद्दल  “गेट-टुगेदरचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी सर्व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी गुरुजणांचा सन्मान करुन त्यांना फेटा श्रीफळ व भेटवस्तु देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्या धाम प्रशाला शिक्रापुर शाळेस आठ ग्रीन बोर्ड व एक ई लर्निंग संच भेट देण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापुर या शाळेससुद्धा दोन ग्रीन बोर्ड व एक ई लर्निंग संच भेट देण्यात आला.  यावेळी शिक्षक विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी स्नेहभोजनचा कार्यक्रमही झाला. ऐश्वर्या जांभेकर, डाॅ. रविन्द्र टेमगिरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रितम शिर्के यांनी केले तर, आभार मोहन हरगुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश खैरे, हनुमंत लांडे, अनिल होळकर, रामा साबळे, महेंद्र शिर्के, माऊली ताजणे, प्रशांत ऊबाळे, जालिंदर वाबळे,नितीन घाडगे, किशोर मांढरे, दिपक सातकर, अविनाश पलांडे, अविनाश जगताप
, शारदा बांगर, जयश्री नवले, ललिता हिरवे ,संध्याराणी सासवडे जयंतीलाल पटेल संतोष लांडे गोदावरी ढमढेरे, रमेश भुजबळ ,रमेश रासकर, राजेद्र गायकवाड अतुल गायकवाड गजानन फुंदे, सचिन खेडकर सुनिल लष्करे अनिल राऊत, भरत भुजबळ, यांनी प्रयत्न केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *