रोहिलवाडीत शंभूदेव मूर्ती,नंदी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा विधिवत संपन्न

803
           शिरूर,पुणे  : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या घोडनदीच्या तीरावर निसर्गरम्य परिसरात वसलेल्या कवठे येमाई येथील रोहिलेवाडीत आज शंभूदेव मूर्ती,नंदी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा विधिवत संपन्न झाला. भागवताचार्य हरी भक्त पारायण सुभाष महाराज लबडे यांच्या हस्ते हे सर्व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सद्स्य जाकिरखान पठाण,रयतचे विभागीय अधिकारी किसनराव रत्नपारखी,पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सरपंच अरुण मुंजाळ मिठूलाल बाफना ,माजी सरपंच संगीता रामदास रोहिले,बबनराव पवार, सुरेश रोहिले,सागर रोहिले,विलास रोहिले व विविध गावातून आलेले अनेक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.
  येथील ज्ञान मंदिरालगत उभारलेल्या मंदिरात श्री शंभूदेव मूर्ती,नंदी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहाळ्यानंतर व ह.भ.प. सुभाष महाराज लबडे यांच्या सुश्राव्य कीर्तनसेवेनंतर महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *