विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता व संस्कार असणे ही काळाची गरज -किसनराव रत्नपारखी 

1036
       कवठे येमाई ता.शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – जीवनात स्वसामर्थ्यावर कीर्तिमंत,यशवंत व्हायचे असेल तर विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांकडे सर्वगुणसंपन्न गुणवत्ता व सुयोग्य संस्कार असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रयत शिरक्षण संस्थेचे पुणे विभागीय अधिकारी किसनराव रत्नपारखी सर यांनी केले. ते आज संस्थेच्या शिरूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कुल कवठे येमाई येथील १० च्या विद्यार्थ्याना शुभचिंतन व १२ वीच्या विद्यार्थ्याना निरोप  समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदरक्षण करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुल कमिटीचे जेष्ठ अध्यक्ष अर्जुनदादा सांडभोर हे होते.
       यावेळी शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे, सरपंच अरुण मुंजाळ, उद्योजक बाळासाहेब डांगे, जुनिअर कॉलेजचे उपाध्यक्ष जवाहरलाल बाफणा,साधना विद्यालय हडपसरचे कलाशिक्षक कारभारी देवकर,माजी प्राचार्य आर के मोमीन,रितेश शहा,गुलाबराव वागदरे,बाबुशा पाटील कांदळकर,आबासाहेब वागदरे,उत्तमराव जाधव,बाजीराव उघडे,दीपक रत्नपारखी रामदास इचके,शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थिनी व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         न्यू इंग्लिश स्कुल कवठे येमाई विद्यालयातील  १० च्या विद्यार्थ्याना शुभचिंतन व १२ वीच्या विद्यार्थ्याना निरोप समारंभाचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी रत्नपारखी पुढे बोलताना म्हणाले कि, मी या गावचाच मूळ रहिवासी असलेने माझे विद्यालयीन शिक्षण ही याच रयतेच्या शाळेत झाले. संत गाडगेबाबा यांच्या विचारंशी प्रेरित होऊन येथील ग्रामस्थांनीही शाळेसाठी भरभरून योगदान देण्याचे काम केले आहे. आजच्या काळातील  विद्यार्थ्याना सर्वांगीण शैक्षणिक सुविधा व अद्ययावत इमारत उभारण्याचे काम सर्वच ग्रामस्थ माजी विद्यार्थी मनापासून करीत आहेत. माझ्या रयत शाळेसाठी मी सातत्याने झोकून देत कार्यरत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक शैक्षणिक सुविधा कशा प्राप्त होतील यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. येथील शाळेच्या लॅब साठी नुकताच २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांना जीवनात काही घडायचेय त्यांनी विद्यालययीन शिक्षण घेत असताना सकारत्मक दृष्टिकोण ठेवून शिक्षणाचा पाया पक्का करावा.संस्कार हे सांगून येत नाहीत तर ते अवगत करावे लागतात मगच  जीवनात यश प्राप्त करता येते. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णांचा आदर्श व त्यांचे संस्कार समोर ठेवून शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन ही त्यांनी केले.
         तर कवठे शाळेविषयी गौरवोद्गार काढताना रत्नपारखी म्हणाले कि, ही एक नावाजलेली शाळा असून येथील मुलांना असणारी शिस्त नक्कीच थक्क करणारी व कौतुकास्पद आहे. विविध स्पर्धा,खेळ,शिष्यवृत्ती परीक्षा यात या शाळेतील विद्यार्थ्याची भरारी नक्कीच अभिनंदनीय गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
      यावेळी विद्यार्थी,ग्रामस्थांनी मनोगते व्यक्त केली. मुख्याध्यापक बेलकर सर यांनी प्रास्ताविक,परवीन इनामदार यांनी सूत्रसंचालन तर थोरात सर यांनी आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *