आंबेगाव तालुक्यात १०१५ जण कोरोनाबाधित ; तरूणांचे प्रमाण सर्वाधिक  

547
घोडेगाव, ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : आंबेगाव तालुक्यात दि. २ सप्टेंबर पर्यंत एक हजार पंधरा कोरोनाबाधित रूग्णांपैकी २१ ते ६० वयोगटातील पुरूष ६२१ पुरूष कोरोनाबाधित आढळून आल्याने नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे. कोरोनाचा धोका वृध्दांना जरी जास्त असला तरी आकडेवारीनुसार तरूणांचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे.
तालुक्यातील लोकांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. त्यांचा संपर्क अनेकांशी येत असल्याने आणि योग्य ती खबरदारीही पुरेशा प्रमाणात घेतली जात नसल्याने कोरोनाची रूग्ण संख्या वाढत असल्याचे नागरिक सांगत आहे. तालुक्यात आढळलेल्या शुन्य ते दहा वयोगटातील पुरूष ४५ तर स्त्री ३९ असे एकंदरीत ८४ जणांना कोरोनाने घेरले आहे. ११ ते २० वयोगटातील पुरूष ६९, स्त्री ५६ किशोरवयीन १२५ व्यक्ति आहे. कोरोना बाधित तरूणांच्या जिवावर बेतण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु त्यांच्यामुळे कुटुंबीय बाधित झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामध्ये ६० वर्षावरील वृध्दांना मृत्युचा धोका असल्याने तरूणांनी बाहेर फिरताना किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर वावरताना पुरेशी काळजी घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांना मोठया प्रमाणात बाधा होत असल्याचे दिसुन येत आहे. वयोवृध्द नागरिकांना इतर आजार असतात त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असल्याने त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
तालुक्यात आढळलेल्या सुमारे एक हजार पंधरा कोरोना बाधितां पैकी पुरूष सुमारे ६२१ आहे. तर स्त्री ३८७ रूग्ण २१ ते ६० वर्षे वयोगटातील आहेत. त्या खालोखाल ६१ ते ७० वयोगटातील पुरूष ७५, स्त्री ५७ रूग्ण असे एकुण १३२ आहे. ७१ ते ८० वयोगटातील पुरूष ३८, स्त्री ११ रूग्ण. ८१ ते ९० वयोगटातील पुरूष ७ तर स्त्री २ रूग्ण तसेच ९१ ते १०० वयोगटातील स्त्री १ आहे. आता कोरोना नागरिकांच्या घरांमध्ये पोहोचला आहे. तालुक्यातील विविध पक्ष एकत्र येवून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबवत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *