“मास्क” निर्मितीतून महिला होताहेत स्वयंपूर्ण

351

सुदर्शन केमिकल्स  इंडस्ट्रीज, सुदर्शन सीएसआर फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन केल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांचा रोजगार थांबला होता. घरातील रोजचा खर्च कसा भागवायचा, अशी भ्रांत रोहा तालुक्यातील अनेक महिलांना होती. लॉकडाऊन काळात या महिलांच्या हाताला काम द्यावे, या उद्देशाने सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज संचालित सुदर्शन सीएसआर फाउंडेशनच्या वतीने फेस मास्क शिवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. सुदर्शन सीएसआर फाउंडेशनच्या सुधा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना जोडून घेत रोजगाराची ही नवी संधी निर्माण केली आहे. आज १०० पेक्षा अधिक महिलांनी एक लाखाहून अधिक मास्क शिवले आहेत. त्यातून महिलांना उत्पन्नाचा एक चांगला स्रोत मिळाला आहे, अशी माहिती सुदर्शन सीएसआर फाउंडेशनच्या व्यवस्थापक माधुरी सणस यांनी दिली.

 

“लॉकडाऊनमुळे आमच्यासारख्या सामान्य गृहिणीचे हाल सुरु झाले होते. परिस्थिती बेताचीच असल्याने काय करावे हे सुचत नव्हते. अशावेळी सुदर्शन संस्थेने मास्क शिवण्याचा उपक्रम आम्हाला सांगितला. घरबसल्या मास्क शिवण्याचे काम मिळाल्याने घर खर्च भागवण्यास मोठी मदत झाली. या उपक्रमामुळे आम्हाला रोजगार तर मिळालाच; शिवाय राष्ट्राची सेवा करण्याची संधीही मिळाली. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या संकटात सुदर्शनने दिलेल्या मदतीबद्दल धन्यवाद देते.” – प्रतिभा मोरे रा. विष्णुनगर, धाटाव, ता. रोहा. जि. रायगड

 सुदर्शनच्या सुधा महिला बचत गटातील सर्व महिला गृहिणी किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या आहेत. रोहा तालुक्यातील धाटाव, वाशी, वरसे  आणि जवळच्या गावातील महिलांचा यामध्ये सहभाग आहे. सुदर्शनच्या वतीने या महिलांना शिवणकाम प्रशिक्षण, कापड आणि दोऱ्याची रीळ देण्यात येत असून, लॉकडाऊनमुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत या महिलांनी उत्तम दर्जाचे दोन स्तर असलेले मास्क बनवले आहे. त्यांनी शिवलेले मास्क बचत गटाच्या माध्यमातुन विकले जात आहेत. हे मास्क पूर्णतः सुती कापडापासून बनवलेले आहेत. रायगडसह पुणे आणि इतर शहरातील अनेक संस्थांकडून हे मास्क विकत घेतले जात आहेत. मास्क शिवण्याचा कामातून हजारो रुपयांची उलाढाल झाली. सुधा बचत गटातून सगळे आर्थिक व्यवहार होत आहेत. समाजातील विविध संस्थांकडून या मास्कला मोठी मागणी आहे. प्रत्येक महिलेला स्वयंपूर्ण बनविण्याचे ध्येय सुदर्शन सीएसआर फाउंडेशनने हाती घेतले आहे,” असेही माधुरी सणस यांनी सांगितले.

“कंपन्या बंद झाल्या, शेतीची कामे बंद झाली. अशावेळी घर चालविण्याचे मोठे संकट ठाकले होते. पण सुदर्शनने संस्थेने आमच्या गावातील महिलांना मास्क शिवण्याचे काम दिले. मास्कसाठी लागणारा कच्चा मला संस्थेकडून मिळत होता. आम्ही फक्त मास्क शिवून देतो. हे मास्क विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आमचे घर चालू लागले आहे. या उपक्रमामुळे आमच्यासमोरील मोठी समस्या सुटली आहे. – समृद्धी लहाने, रा. वाशी, ता. रोहा. जि. रायगड.

 

सुदर्शनच्या सुधा महिला बचत गटाच्या महिलांनी शिवलेले मास्क आम्ही घेतले. अतिशय उत्तम प्रतीचे आणि कोरोनापासून सुरक्षित ठेवणारे असे हे मास्क आहेत. नाशिक जिल्ह्यातील पिरॅमिड आदिवासी शाळेत या मास्क आम्ही वाटले. इतर शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांसाठी हा एक प्रेरक उपक्रम आहे. राज्यभरात गरजूना हे कापडी मास्क वाटण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. त्यातून या महिलांनाही रोजगार मिळेल.” – सुरेंद्र श्रॉफ, पर्यावरण प्रकल्प प्रमुख, रोटरी क्लब




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *