अधिकारीच नसल्याने ग्राहकांची कुचंबना – कवठे येमाई येथील सिंडिकेट (कॅनरा) बँकेचे ग्राहक एक महिन्यांपासून त्रस्त – आगामी ७ दिवसांत अधिकारी वर्ग देण्याचे डिव्हिजनल मॅनेजर चंदनकुमार यांचे आश्वासन 

637
             शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे मागील ४० वर्षांपासून कार्यरत असलेल्या राष्ट्रीकृत सिंडीकेट (आत्ताची कॅनरा) बॅंकेत मागील एक महिन्यांपासून अधिकारीच नसल्याने बँकेच्या ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत पत्रकार सुभाष शेटे यांनी कॅनरा बँकेचे डिव्हिजनल मॅनेजर चंदनकुमार यांचेशी संपर्क साधल्यानंतर येत्या ७ दिवसांत कवठे शाखेत रिक्त असणाऱ्या जांगांवर तात्काळ अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
              सुमारे १६ हजार लोकसंख्या असलेल्या कवठे येमाई येथील सिंडीकेट बँकेत परिसरातील वाड्यावस्त्यांसह इतर गावातील अनेक नागरिक,शेतकरी,दूध उत्पादक व इतर व्यावसायिकांचे बँकेत खाते असून दैनंदिन व्यवहार सुरु असतात. मागील एक महिन्यांपूर्वी या शाखेतील व्यवस्थापक,उपव्यव्यवस्थापक,शेतकी अधिकारी यांची इतरत्र बदली झाली असून अद्याप या शाखेत नवीन नियुक्ती झालेली नाही.परिणामी ग्राहकांचे बँकेशी निगडीत कर्जप्रकरणे,लेणदेन,नवीन खाते उघडणे,दाखले व इतर सेवा मिळण्यासाठी अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. येथील ए टी एम ही वारंवार बंद असते. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेशी संपर्क,व्यवहार करताना अनंत अडचणीचा सामना व मनस्ताप ग्राहकांना करावा लागत असून येथे तात्काळ अधिकारी नियुक्त करण्याची मागणी शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,माजी सरपंच अरुण मुंजाळ,अनिल रायकर,अमोल शिंदे व नागरिकांनी केली आहे.
            येथील सिंडीकेट,कॅनरा बँकेच्या ग्राहकांना बँकेशी निगडीत जाणवत असलेल्या अनेक अडचणी,समस्या पत्रकार शेटे कॅनरा बँकेचे डिव्हिजनल मॅनेजर चंदनकुमार यांना सांगितल्यानंतर येथे तात्काळ ७ दिवसांत अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *