बळीराजा शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी जयवंतराव भाकरे यांची निवड 

396
               शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या बेट भागातील भाकरेवाडीतील उपक्रमशील व शेतीनिष्ठ जेष्ठ शेतकरी जयवंतराव भाकरे यांची बळीराजा शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्या संदर्भातील संघटनेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख व पुणे जिल्हाध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र दिल्याचे भाकरे यांनी सांगितले.
               भाकरेवाडी सोसायटीचे चेअरमन असलेले जयवंतराव भाकरे हे प्रगतीशील व कृतीशील उच्चशिक्षित शेतकरी असून शेती,त्यातील अडचणी व उपाय यात त्यांचे उत्कृष्ठ असे ज्ञान असून तालुक्यातील विविध गावातील शेतकऱयांना त्यांच्या शेतीविषयक ज्ञानाचा भरपूर उपयोग होत आहॆ . भाकरे यांच्या समाजनिष्ठ शेतीविषयक कार्याची दाखल घेत त्यांची आता नव्यानेच बळीराजा शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा आदर्श मानून जिल्ह्यातील शेतकरी,शेतमजूर यांना न्याय,हक्क मिळण्यासाठी कार्य करणार असल्याचे भाकरे यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल बेट भागातील माळवाडी या त्यांच्या मुळगांवासह तालुक्यातून अभिनंदन होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *