घोडेगाव ग्रामीण रूग्णालय येथे रूग्णांच्या मदतीसाठी मदत कक्ष सुरू – डॉ. अमोल वाघमारे  

533
             घोडेगाव,आंबेगाव : (प्रतिनिधी,सीताराम काळे) –  आंबेगाव तालुक्यात कोरोनाच्या पार्ष्वभूमिवर दिवसेंदिवस कोरोना बाधित व्यक्ति वाढत असल्याने डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांची जबाबदारी वाढत चालली असल्याचे दिसुन येत आहे. याच अनुशंगाने पुणे येथील अनुसंधान ट्रस्ट -साथी या संस्थेने घोडेगाव ग्रामीण रूग्णालय येथे रूग्णांच्या मदतीसाठी मदत कक्ष सुरू केला असल्याचे डॉ. अमोल वाघमारे यांनी सांगितले.
           घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात हा मदत कक्ष अनुसंधान ट्रस्ट साथी या संस्थेच्या सहकार्यातून व आदिम संस्थेच्या स्थानिक संयोजनातून १८ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला. या कक्षाच्या माध्यमातून रूग्णांना मदत कशी करता येईल हे जाणून घेवून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये रूग्णांना शासकीय रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रूग्णांना संबंधित वार्ड दाखवून देणे, दोन रूग्णांमध्ये ५ ते ७ फुटांचे अंतर ठेवणे, तसेच समुपदेशन करून कोरोना विषयक भीती कमी करणे, गरोदर महिलांना व त्यांच्या नातलगांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे, विदयार्थ्यांना मेडिकल सर्टिफिकेट मिळवुन देणे, रूग्णांना महात्मा फुले योजनेची माहिती बरोबरच इतर ही विविध सरकारी योजनांची माहिती देणे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा दिली जात आहे. या मदतकक्ष मध्ये संस्थेच्या अर्चना गवारी व अनिल सुपे रूग्णांना सेवा पुरवतात.
               या मदत कक्षाला रूग्णालयातील वैदयकीय अधिकारी यांच्यासह इतर डॉक्टर व सर्व कर्मचा-यांचेही सहकार्य मिळत आहे. तर अनुसंधान ट्रस्ट साथी संस्थेचे भाऊसाहेब आहेर, आदिम संस्थेचे राजु घोडे, अविनाश गवारी, डॉ. अमोल वाघमारे हे याचे संयोजन व व्यवस्थापन करत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *