तांदळी जि.प.शाळेत चिमुकल्यांनी भरविला आनंदी बाजार – ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद 

1006
          तांदळी,शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने शिरूरच्या पूर्वभागातील केंद्र शाळा असलेल्या  तांदळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भव्य प्रांगणात शाळेतील चिमुकल्यांच्या आनंदी बाजार या उपक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.केंद्र प्रमुख सुनील गुमरे व मुख्याध्यापक उत्तम कळमकर यांनी या विधायक व स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. बालचमूंनी भरविलेला हा आनंदी बाजार ग्रामस्थांच्या उदंड प्रतिसादाने अत्यंत उत्साहात पार पडला. शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र गदादे,चेअरमन संजय कळसकर व मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती पूजनाने या आनंदी बाजारचा प्रारंभ करण्यात आला.

​            या ​ आनंदी​ ​बाजारात ​बालचमूंनी विक्रीसाठी आणलेल्या विविध वस्तू,भाजीपाला व इतर साहित्य ​खरेदी करण्यासाठी ​ग्रामस्थांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती.विशेषेकरून या शाळेत शिकणाऱ्या व आनंदी बाजारात सहभागी झालेल्या पाल्यांचे व्यावहारिक कौशल्य पाहण्यासाठी पालकांनी मोठा सहभाग दर्शवित खरेदी केली. पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे,ग्रामपंचायत तांदळी​ सरपंच,उपसरपंच,सदस्य,कर्मचारी​, तांदळी केंद्राचे​ ​केंद्रप्रमुख, परिसरातील सर्व​च ​ शाळा व​ त्या शाळेतील ​शिक्षकवृंद,समस्त ग्रामस्थ​ यांनी या उपक्रमास प्रतिसाद देत ​ मो​ठा ​ सहभाग घेतला.

​      दरम्यान विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या आनंदी बाजारात एकूण २५ हजार रुपयांची उलाढाल झाली. ​केंद्र शाळेच्या या स्त्युत्य उपक्रमात सहभागी झालेल्या बालकांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *