शिक्रापूर,शिरूर : श्री.सिध्दीविनायक चाँरिस्टेबल ट्स्ट व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजिकता शिबीर संपन्न – ३५० महिला शिबिरात सहभागी

499
        शिक्रापूर,शिरूर : श्री.सिध्दीविनायक चाँरिस्टेबल ट्स्ट व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे महिला उद्योजिकता शिबीर संपन्न झाले. ग्रामीण भागातील महिलांना स्वंयरोजगार उपलब्ध झाला तर महिला निश्चित आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असे मत कस्तुरबा खादी उद्योघागाचे पुणे येथील प्रचार्य उमा धोञे यांनी व्यक्त केले. शिक्रापूर जवळील मलठण फाटा सायकर मळा सिध्दीविनायक पब्लिक स्कुल शिक्रापूर येथे महिलासाठी उद्योजकता शिबीर प्रसंगी ते बोलत होते. सदर प्रशिक्षण अंतर्गत कुकींग केटरिंग,मुखवास,पापड मसाला,आईस्किम,कापडी बँग,पेटीकोट,मेणबत्ती ,खडु,इत्यादी साहित्य बनवण्याचे प्रशिक्षण  देण्यात आले.त्याचबरोबर संस्थांची पुर्ण महिती,शासकीय योजना,बँक,मार्केट सर्वे,प्रकल्प अहवाल,कच्चा माल,परवाने,याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.शिबीराच्या निमित्ताने  महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या चेअरमन मनिषा सायकर,मुदला जक्कल,रमनी पिल्ले,सपना सायकर,शितल सायकर,खंडेराव तनपुरे,लायन ढोले,शाळेचे प्राचार्य श्याम जेगनराज अन्य उपस्थित होते .कार्यक्रमाचे स्वागतपर प्रस्ताविक लायन्स क्लब लोटसचे अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी केले. तर या प्रशिक्षण शिबीरात ३५० महिलांनी सहभाग घेतला. बाबुराव साकोरे यांनी अभार मानले.
 – प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *