दोंडाईचा येथे शंभोग्रुप वंजारी समाजातील महिलांनी केले शिवजयंती निमित्त शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन

555

दोंडाईचा,धुळे (– प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : दोंडाईचा शहरातील शंभो ग्रुप वंजारी समाजाकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमापुजन करण्यात आले. शहरातील प्रसिद्ध असलेला शंभो ग्रुप अगळे-वेगळे कार्यक्रम राबवत असतो. शंभो ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हरेश भाऊ आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने महिलांकडून छत्रपतींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड उपस्थित होते. तसेच यावेळी कार्यक्रमाला रविंद्र काकडे, सौरभ आव्हाड, स्वामी वंजारी, अतुल कागणे, हर्षल कागणे, दिलीप काकडे, संदीप काकडे, कुणाल कागणे, पवन नागरे, सचिन आंधळे, मानव कागणे, धीरज आव्हाड, स्वामी नागरे, समर्थ वंजारी, नरेंद्र धात्रक, गिरीश ठाकूर, विक्की बोरसे, विलास ठाकूर, सचिन कळकटे, रॉनी ठाकूर, निखिल ठाकूर, प्रतीक चौधरी, किरण बडगुजर आदी उपस्थित होते. यावेळी वंजारी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन शंभो ग्रुप व वंजारी समाजातील युवकांनी केले होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *