जि.प. शाळा प्रथामिक शाळेमध्ये स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

570

शिक्रापूर, ता.शिरुर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : सन १९८८-८९ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा जि.प. शाळा प्रथामिक शाळेमध्ये स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. तब्बल ३५ वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा भरली, तर ३५ वर्षानंतर शाळेमध्ये पुन्हा एकत्र आल्याचे एकमेकांना पाहून प्रत्येकालच आनंद होत होता. काही माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम घेण्याचे ठरले. त्यानंतर अथक परिश्रमातुन हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच ३५ वर्षाच्या कालखंडात ज्या गुरुजनाचे निधन झाले अशा सर्व गुरुजंनाना श्रंध्दाजली वाहाण्यात आली. यामध्ये दि.म.सासवडे, किसन विरोळे, विठाबाई वाघोले, पांडुरंग जकाते, ज्ञानेश्वर भुजबळ, विद्याधाम प्रशालेचे माजी प्राचार्य एल.टी. कुलकर्णी, भालचंद्र वाखारे व अन्य गुरुजणाना समावेश होतो. याकार्यक्रमाला जवळपास १०० माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्रीधर टेमगिरे, मालन टेमगिरे, बापूसाहेब निकम, बाबुराव साकोरे, रमेश ठाकुर, एम.के.शेळके, सर्जेराव गायकवाड, सोपान टेमगिरे, सुर्यकांत शिर्के या गुरुजन वर्गाचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुजनांनी आपली मनोगते व्यक्त केली. ” ३५ वर्षानंतरही आमची आठवण ठेऊन, आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेञात चमकले हेच आमच्या सत्कारापेक्षा मोठी गुरुदक्षिणा असल्याचे गुरुजनांनी भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये नरेश कर्पे, पी.आय. बाळासाहेब भरणे, माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, बालरंगभुमीचे सदस्य तथा निर्भिड पत्रकार राजाराम गायकवाड, कैलास कोठावळे, श्यामराव गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने २५ हजाराची रोख रक्कम व इतर वैयक्तिक १५ हजार अशी एकूण ४० हजाररुपयांची  देणगी शासकीय इमारत रंग कामासाठी मदत निधी म्हणुनशाळेच्या मुख्यध्यापिका शैलजा कांबळे यांच्या कडेदेण्यात आली. कार्यक्रमात माजी विद्यर्थीनींची सख्यां लक्षणीय होती. त्यामध्ये भारती मांढरे, जयश्री गावडे, नलिनी घारे, रंजना घोलप, वंदना शिंदे, सुनिता सातकर, संध्या जगताप, सुनंदा भुजबळ, आशा सासवडे, मंदा आढाव, यांच्या सह विद्यार्थी बाजार समितीचे सभापती आनिल भुजबळ, दताञय शिंदे, रांजेद्र काळे, जिंतेद्र साळुखे, येरवडा कारागृहाचे दता चव्हाण, उमेश भिवरे, तात्या चव्हाण, संतोष भुजबळ, रोहिदास मासळकर, पिंपरी चिंचवडचे श्याम गायकवाड आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन जिजामाता हाँस्पिटलचे डॉ. मछिंद्र गायकवाड यांनी केले, तरकार्यक्रमाचे अभार शाळेच्या मुख्यध्यापिका शैलजा कांबळे यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *