रांजणगाव येथे अवैध वेश्या व्यवसायावर छापा ; 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

539

शिरूर, रांजणगाव गणपती : रांजणगाव परिसरात अवैधरीत्या वेश्या व्यवसाय चालत असल्याची पुणे ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच रांजणगाव पोलिसांच्या मदतीने हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी छापा टाकला असता, हॉटेल मुक्ताई येथे तीन परप्रांतीय महिला (पश्चिम बंगाल) व हॉटेल गारवा येथे दोन परप्रांतीय (पश्चिम बंगाल) महिला यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या सात इसमांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर 5 महिलांची सुटका करून त्यांना सुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी 1) महेश उर्फ बापुण 2) सुमित साहू 3) संदीप बळवंत येंधे, रा.जुन्नर जि.पुणे  4) राजू पित्तवास साहू, रा. ओडिसा 5) संतोष लोकनाथ बेहरा, रा. ओडिसा 6) नारायण संजय दुधाटे, रा. परभणी 7) राकेश उर्फ लूफताद रहमान शेख असे एकूण 7 आरोपींविरुद्ध रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये  अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई दरम्यान ४ जणांना ताब्यात घेऊन त्यांना मा.कोर्टात हजार करण्यात आले. तर आरोपींना सोमवार (दि. २४) पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असल्याचे ऍडव्होकेट किरण रासकर यांनी सांगितले. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना,दौंडच्या उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्य्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस नाईक अजित भुजबळ, पोलीस नाईक मंगेश थिगळे, पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ हाळनोर, महिला पोलीस कॉन्स्टेबल राधिका वायाळ,मोनिका वाघमारे,शुभांगी पवार यांनी तसेच बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस जवान सुरेंद्र वाघ,संदीप जाधव,स्वप्निल अहिवळे,विशाल जावळे, आरसीपी पथकातील महिला पोलीस जवान मंगल बनसोडे व मेघा इंगळे यांनी कारवाई केली. पुढील तपास सहाय्य्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम हे करत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *