वढू बुद्रुक,पुणे : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप मध्ये मोफत आरोग्य शिबीर संपन्न, डॉ.वर्षा शिवले यांचे विशेष प्रयत्न

577
          वढू बुद्रुक,पुणे : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप गावामध्ये डॉक्टर वर्षा ताई शिवले संचालिका पिडीसीसी बँक पुणे यांच्या विशेष प्रयत्नातून गरीब व गरजू रुग्णांसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केअर हॉस्पिटल वाघोली यांच्या वतीने विविध आजारांवर मोफत उपचार शिबीर घेण्यात आले.
         कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.वर्षा ताई शिवले यांच्या हस्ते झाले. मुख्य पाहुणे पंचायत समितीचे माजी सदस्य भगवानराव शेळके तसेच पिंपळे जगताप च्या सरपंच पुष्पाताई जगताप ,उपसरपंच लक्ष्मण भुजबळ ,ग्रामपंचायत सदस्य उत्तम बेंडभर ,श्री पंडितराव सोंडेकर ,अशोक नाईकनवरे, संगीता रासकर श्री नानासो जगताप ग्रामसेवक श्रीमती सी एस साकोरे, श्री दत्तात्रय तांबे, सौ द्रोपदी भुजबळ ,माजी उपसरपंच सौ ललिता तांबे; कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक जगताप  तर आभार सौ एस एन बुद्धिवंत यांनी मानले.यावेळी अनेक गरीब व गरजू रुग्नांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले.
राजाराम सकट प्रतिनिधी,(सा.समाजशील,वढू बुद्रुक)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *