अलिबाग,रायगड : गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक संकल्पनेतून तालुक्यातील कुसुंबळे येथे शिवसेना शाखेची स्थापना, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांचा उपक्रम सुरु

1054
           अलिबाग,रायगड : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक आशा संकल्पनेतून साकार झालेल्या नवनिर्वाचित शिवसेना तालुका प्रमुख राजा केणी यांचे नेतृत्वाखाली व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्यातील कुसुबळे येथे आज सोमवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी शिवसेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली.  कुसुबळे परिसरातुन कुसुबळे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गजानन खरसंबळे यांचे गळ्यात शाखा प्रमुख पदाची माळ घालून शिवसेनेने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्याच बरोबर संदीप पाटील यांना उपाध्यक्ष व निलेश पाटील याना गट प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. पुढील दोन महिन्यात येणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत व्हावी या उद्देशाने शिवसेनेने तालुक्यात  हे मोठे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. अलिबाग तालुक्यात प्रत्येक गावोगावी शिवसेना शाखा स्थापन करण्यात येत असल्याचे शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी सा. समाजशीलशी बोलताना सांगितले.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *