भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांचा दोंडाईचा नाभिक समाजाच्या वतीने सत्कार

329

दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार भाऊ रावल यांचे खंदे समर्थक, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण भाऊसाहेब यांची भाजपा धुळे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने दोंडाईचा शहर नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सैंदाणे, तालुका अध्यक्ष रवींद्र चित्ते, जेष्ठ सल्लागार भावराव सैंदाणे, दोंडाईचा शहर अध्यक्ष देविदास चित्ते, दोंडाईचा दुकानदार संघाचे अध्यक्ष किरण सुर्यवंशी, उपाध्यक्ष महेंद्र चित्ते, अनिल ईशी, राजेंद्र सैंदाणे, दिलीप सैंदाणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेबांचे मनपुर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *