पिंपळे पिंपळे खालसा येथे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार 

584

शिक्रापूर,ता.शिरुर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : पिंपळे पिंपळे खालसा येथे ग्रांमपचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करत असणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालरंगभुमीचे अरुण पटवर्धन व दिपाली निरगुडसर यांच्या द्विपाञी  “रेशीम लडी ” कौटुंबिक जीवनावर आधारित धमाल विनोदी नाटीका सादर करण्यात आली. महिला दिनाच्या कार्यक्रमाला महिला वर्गाची संख्या लक्षणीय होती. या कार्यक्रमाला जि.प.च्या स्वाती पाचुंदकर, जि.प. सदस्या कुसुम मांढरे, नाट्य परिषद शिरुर शाखेच्या अध्यक्षा दिपालीताई शेळके, विद्यमान सरपंच समीर धुमाळ, उपसरपंच पुष्पाताई धुमाळ, ग्रा.प.सदस्या अंजना शेळके, ग्रामसेविका शितल भालसिंग, कैलास धुमाळ, अप्पासाहेब धुमाळ, राजेंद्र भोसले, विलास धुमाळ, प्रकाश धुमाळ अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी विविध खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामधुन विजयी महिलांना पैठणी साड्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुञसंचालन शितल भालसिंग यांनी केले. कार्यक्रमाला एकुण ३०० महिलांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे अभार पुष्पा धुमाळ यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *