शिरूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर 

861
             शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील 93 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज् शिरूर प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार लैला शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहावयास मिळाली.आरक्षण सोडतीनंतर सरपंच पदासाठी इच्छूक असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतीत कभी खुशी कभी गम निर्माण झाली आहे.

शिरूर तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सर्वत्र सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची उत्सुकता लागली होती.तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीवर अनुसूचित जाती महिला आरक्षण,तर सर्वात मोठ्या शिक्रापूर ग्रामपंचायतीवर अनुसूचित जाती आरक्षण पडले आहे.शिरूर तालुक्‍यातील एकूण 93 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामध्ये 57 जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित आहेत.  पैकी 29 ठिकाणी सर्वसाधारण महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 25 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.यात 13 महिलांसाठी जागा आरक्षित आहेत.अनुसूचित जमातीसाठी 3 पैकी महिलांना 2, अनुसूचित जातीसाठी 8 पैकी महिलांना 4 जागा आरक्षित आहेत. अशा प्रकारे शिरूर तालुक्‍यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. तालुक्यातील अनुसूचित जाती,जमाती आरक्षण आहे तसेच ठेवण्यात आले असल्यामुळे आज 82 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली.

ग्रामपंचायत निहाय आरक्षण पुढीप्रमाणे

अनुसूचित जाती महिला 

दहिवडी, गणेगाव खालसा, रांजणगाव गणपती, सरदवाडी, अनुसूचित जाती पिंपरी दुमाला , पिंपळे जगताप, शिक्रापूर, टाकळी भिमा अनुसूचित जमाती महीला  अन्नापूर, शिरूर ग्रामीण अनुसूचित जमाती  विठ्ठलवाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 

करंदी ,करडे, शिरगाव काटा,सविंदणे, बाभुळसर खुर्द ,मांडवगण फराटा, चव्हाण वाडी,कर्डिले वाडी, चिंचणी वाजेवाडी, वडनेर खुर्द ,तळेगाव ढमढेरे ,मलठन
नागरीकांचा मागास प्रवर्ग 
जातेगाव बुद्रुक, मोटेवाडी, न्हावरे,  चिंचोली मोराची ,शिंदोडी ,वरुडे ,कोंढापुरी ,कासारी, जांबुत , निर्वी, उरळगाव,निमगाव दुडे,
 सर्वसाधारण महिला 
आमदाबाद, टाकळी हाजी ,कोळगाव डोळस, जातेगाव खुर्द ,कारेगाव ,खैरेवाडी ,मिडगुळवाडी ,पिंपळे खालसा ,हिवरे, काठापूर खुर्द, सोनेसांगवी, करंजावणे ,रांजणगाव सांडस ढोक सांगवी ,कळवंतवाडी ,धानोरे, तांदळी, सनस वाडी , फाकटे, आंधळगाव ,कुरूळी, कवठे यमाई ,पारोडी ,खंडाळे ,वाघाळे ,आंबळे ,कानुर मेसाई, चांडोह ,इनामगाव.

सर्वसाधारण 

खैरेनगर, पाबळ, आलेगाव पागा ,पिंपळसुटी, बुरुंजवाडी, रावडेवाडी ,तर्डोबाचिवाडी ,भांबर्डे ,गणेगाव दुमाला ,बाभुळसर बुद्रुक, मुखई ,पिंपरखेड, कोरेगाव-भीमा , आपटी, गुनाट,निमोणे,गोलेगाव, दरेकर वाडी ,डिंग्रजवाडी ,नागरगाव, वडगाव रासाई, केंदुर, धामारी ,सादलगाव ,निमगाव भोगी ,निमगाव म्हाळुंगी, वढू बुद्रुक, वाडा पुनर्वसन, याप्रमाणे ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाची आरक्षण सोडत झाली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *