तांदळीत कै. शुभम गदादेचा वाढदिवस, जयंती विविध उपक्रमांनी साजरी 

632

शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पूर्व भागातील तांदळी येथील अखंड समाजसेवेचा ध्यास घेतलेले शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र पोपटराव गदादे यांच्या कुटूंबातील एक तरुण कर्तुत्ववान सदस्य असलेल्या शुभम गदादेचा ऐन तारुण्यात अपघाती मृत्यू झाला व गदादे कुटुंबियांवर मोठे आभाळ कोसळले.नुकताच कै. शुभमच्या २५ वा वाढदिवस त्याच्या आठवणींना उजाळा देत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

काष्टी ता.श्रीगोंदा येथे पार पडलेल्या काष्टी करंडक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघातील २२ खेळाडूंना कै. शुभम दादा गदादे युथ फाउंडेशन व स्वप्निल भुजबळ यांजकडून कै.शुभमच्या वाढदिवसानिमित्त २२ हेल्मेट  भेट देण्यात आले. तर तांदळी गावातील बाबासाहेब रंगनाथ  जाधव  आणि गोविंद काशिनाथ घोडके या दोन कुटुंबांना शुभम दादा युथ फॉउंडेशनच्या  वतीने कै. शुभमच्या वाढदिवसी मेडिक्लेम पॉलिसी करून देण्यात आली. घरातील एक कर्तुत्ववान तरुण अकाली जावून ही गदादे कुटुंबाने त्याचा समाजसेवेचा वसा व कार्य विविध समाजहिताचे उपक्रम राबवित सुरूच ठेवले आहे. गदादे कुटुंबाचा ध्यास निरंतर समाजसेवेचा हे कार्य नक्कीच कौतुकास्पद व अनुकरणीय असेच आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *