कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा – संदीप गायकवाड 

738

शिक्रापूर,ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : कोरोना या महामारीला संपूर्ण जग तोंड देत आहे. याच पार्श्ववभूमीवर आपण आपली काळजी घेणे तसेच सुरु झालेल्या पावसाळ्यात स्वछता ठेवणे गरजेचे असताना मात्र पुणे-नगर रोडवरील शिक्रापूर येथील मलठण फाट्यानजीक असणाऱ्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आढळून आल्याने ग्रामस्थ बाळासाहेब गायकवाड व संदीप गायकवाड यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देत, तेथील लवकरात लवकर स्वछता करण्यात यावी तसेच तेथे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी विनंती त्यांनी ग्रामपंचायतीस लेखी निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना सारख्या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमी आणि भर पावसाळ्यात या कचऱ्यातून मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरत असून कोरोना सारखे विविध साथीचे आजार पसरण्याचा धोका मोठया प्रमाणात होत असून, सर्व सामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. तर शेजारीच आमची शेती आणी दुकाने असल्यामुळे आम्हांला तेथे पाच मिनिटे सुद्धा ऊभे राहणे अशक्य असल्याचे गायकवाड यांनी निवेदनात सांगितले आहे. तरी सदर ठिकाणी सर्व प्रकारचा कचरा टाकण्यास मनाई करून तशा आशयाचा फलक लावण्यात यावा. व तेथे साठलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची विनंती त्यांनी केली आहे. तर सर्वांनी देखील या काळात आपला परिसर स्वछ ठवण्याचे आव्हान त्यांनी नागरिकांनी केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *