नगरसेवक हितेंद्र महाले यांच्याकडून अर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे वाटप

345

दोंडाईचा,धुळे(-प्रतिनिधी,समाधान ठाकरे) : शहरात जनकल्याण चॅरिटेबल सोसायटी व नगरसेवक हितेंद्र महाले यांच्या तर्फे भारत सरकार द्वारा प्रमाणित करण्यात आलेल्या रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम-30 होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप नगरसेवक हितेंद्र महाले, नगरसेवक नरेंद्र गिरासे, अँड प्रमोद मराठे, समाजिक कार्यकर्ते भुषण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महापुरातील जॉकवेल परिसरात या गोळ्यांचे वाटप केले असल्याचे नगरसेवक हितेंद्र महाले यांनी सांगितले. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे महाले यांनी समाजाला काही देणे लागते या उदार हेतूने होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम-30 औषध होमिओपॅथी तज्ञ डॉ. राजेंद्र गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन दोन हजार होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत व टप्याटप्याने वाटप करण्यात आले. यावेळी होमिओपॅथी तज्ञ म्हणाले की, औषधी घेतांना तीन दिवसापर्यंत कच्चा कांदा, लसून, कॉफी, तंबाखू, गुटखा, दारु, बीडी, सिगारेट, इत्यादींचे सेवन करून नये. यावेळी नगरसेवक हितेंद्र महाले, होमिओपॅथी तज्ञ डॉ. राजेंद्र गुप्ता, नगरसेवक, नरेंद्र गिरासे, अँड. प्रमोद मराठे, समाजिक कार्यकर्ते भुषण महाजन, सुनील ठाकूर, पै. रोहित ठाकूर, निलेश महाले, रोशन पाटील, सोनू कोळी, विक्की कोळी, अमोल ओतारी, प्रसाद कोळी, निखिल भोई, मयूर कोळी,  सचिन ठाकूर, किशोर कोळी विक्की मिस्तरी आदी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *