होनेवाडी,शिरूर : मुलगी वेदिकाच्या वाढदिवशी होनेवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,पत्रकार पोपटराव पाचंगेंचा स्तुत्य उपक्रम

434
होनेवाडी,शिरूर​ ​​(सुभाष शेटे,कार्यकारी संपादक)​शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धीप्रमुख पत्रकार पोपटराव पाचंगे यांनी आपली मुलगी वेदिका हिचा वाढदिवस होनेवाडी सारख्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देत एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.त्यांच्या उपक्रमाचे माजी आमदार पोपटराव गावडे,शिरुर बाजार समितीचे माजी संचालक सावित्रा थोरात, माजी उपसरपंच सखाराम खामकर,ज्येष्ठ पत्रकार दत्ताजीराव उणवने,देविदास पवार,दिपक सरोदे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय बारहाते, सुरेश चक्रे,पोपट मुंजाळ, मुख्याध्यापक  यशवंत गाडिलकर यांनी कौतुक केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते.
पत्रकार पाचंगेंचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. वाढदिवसाला करण्यात येणारा अवास्तव खर्च टाळून प्रत्येकाने असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. तर  विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात न्यूनगंड न बाळगता आपले ध्येय समोर ठेवून प्रगती साधणे आवश्यक आहे.पाचंगे यांनी आपली कन्या वेदिका हिच्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या ,कंपास,पेन व गणवेश आदि शालेय साहित्य भेट देऊन या विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ दिला हि बाब नक्कीच स्तुत्य व अभिनंदनीय आहे.शैक्षणिक क्षेत्रात सातत्य व ध्येय ठेवल्यास प्रगती होऊन जीवन सार्थकी व यशस्वी होते. शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाबरोबरच दानशूर व्यक्तीनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
– पोपटराव गावडे – माजी आमदार,शिरूर 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *