रामलिंगला नवदुर्गा पुरस्कार सोहळा संपन्न – स्व.गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच व रामलिंग महीला उन्नती बहु.सामाजिक संस्थेचा उपक्रम 

232
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – रामलिंग ता.शिरूर येथील स्व.गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच व रामलिंग महीला उन्नती बहु.सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सव,नवदुर्गा पुरस्कार सोहळा २०२२ आज विजयादशमीस संपन्न झाला.
        रामलिंग महीला उन्नती बहु.सामाजिक संस्था, नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.नवरात्र उत्सवात ९ दिवस  ग्रामीण भागातील महिलांना ,मुलांना आनंद घेता यावा व त्यांचा कला- गुणांना वाव मिळावा यासाठी लिंबू चमचा,वक्तृत्व स्पर्धा,वेशभुषा ,दांडिया स्पर्धा,गरोदर माता ओटीभरन,पाककृती स्पर्धा,होम मिनिस्टर,नृत्य स्पर्धा,नवदुर्गा पुरस्कार यांचे आयोजन केले होते .
आनंदाच्या,उत्सवाचा वातावरणात या स्पर्धा पार पडल्या .या नंतर बक्षीस वितरण करण्यात आले.मुलांना,महिलांना उपयोगी अशी बक्षीसे व पुरस्कार आज देण्यात आले.यावेळी हे सर्वच खूप आनंदी दिसत होते.
      नवरात्र उत्सव २०२२ नवदुर्गा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .यावेळी सौ शारदा जाधव – आदर्श गृहिणी पुरस्कार,सौ सविता बोरुडे – आदर्श उद्योजिका पुरस्कार, कू.किरण पिंगळे – आदर्श महीला पत्रकार पुरस्कार,सौ रोहिणी बढे –  आदर्श धार्मिक कार्य पुरस्कार,डॉ. वैशाली साखरे – आदर्श  वैद्यकीय पुरस्कार,सौ .धनश्री मोरे – आदर्श सरपंच पुरस्कार,सौ शशिकला काळे – आदर्श समाजसेविका पुरस्कार,सौ उषा वेताळ – आदर्श शिक्षिका पुरस्कार,अँड.सारिका वाबळे – आदर्श वकील पुरस्कार असे ९ महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी शिरूर ग्रामीण चे सरपंच श्री नितीन बोऱ्हाडे यांनाही कार्यसम्राट सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
        तर यावेळी मानाची पैठणी स्नेहा जामदार,सोन्याची नथ – सीमा चव्हाण,चांदीचे पैजण – राणी कर्डिले यांना देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य – राजू पाटील जगदाळे, शिरूर नगरीचे नगराध्यक्ष – श्री दादाभाऊ वाखारे,राष्ट्रवादी लीगल सेल चे अध्यक्ष अँड. रवींद्र खांडरे, अँड.  भंडारी,शिरूर ग्रामीण सरपंच – नितीन बोऱ्हाडे, मा.सरपंच श्री तुषार दसगुडे,विद्यमान ग्रा.सदस्य यशवंत कर्डिले,श्री अमोल वर्पे, सामाजिक कार्यकर्ते – शिवाजी दसगुडे,गौतम घावटे, शरद पवार , मीना गवारे,श्रुतिका झांबरे,प्रिया बिरादार,राणी शिंदे,दिपाली ताई,गायत्री ताई,रोहिणी जामदार ,या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच अध्यक्ष श्री मंगेश घावटे,उपाध्यक्ष  योगेश गोसावी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.रामलिंग महीला उन्नती बहु.सामाजिक संस्थेचा अध्यक्षा  – सौ राणी कर्डिले यांनी या नवरात्र उत्सवाचे आयोजन केले होते.उपस्थित सर्व मान्यवर यांनी कर्डिले यांचे मनापासून कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *