कवि व साहित्यकांनी समाजमनाचा ठाव घेऊन समाजाला योग्य दिशा द्यावी – खासदार डाँ. अमोल कोल्हे यांचे गौरवोद्गार- कविवर्य दत्तात्रय जगताप यांचा ‘मनपाखरू’  हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित 

311

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील कविवर्य दत्तात्रय जगताप यांचा ‘मनपाखरू’  हा दुसरा काव्यसंग्रह खासदार डाँ अमोल कोल्हे यांच्या हस्ते नारायणगाव ता.जुन्नर येथे प्रकाशित करण्यात आला.
सुईपासून ते चंद्र,सुर्य व परिसरातील सर्व घटकांना कविवर्य दत्तात्रय जगताप यांनी आपल्या काव्यमाहेत गुंफण्याचा या काव्यसंग्रहातून प्रयत्न केला आहे.कविवर्य जगताप यांच्या पहिल्या ‘लाझ्या’ या शेतकर्याच्या जिवनावरील काव्यसंग्रहाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या प्रसंगी कान्हूर हायस्कूलचे प्राचार्य अनिल शिंदे,आमदाबादचे माजी सरपंच योगेश थोरात,टाकळी हाजीचे उपसरपंच अजित गावडे,निमगाव भोगीचे ग्रा.पं.सदस्य उत्तम व्यवहारे,कविवर्य संदिप वाघोले,शिरूर तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, निमगाव दुडेचे सरपंच दिपक दुडे,सामाजिक कार्यकर्ते अक्षय माशेरे,सविंदणेचे आप्पासाहेब नरवडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिरूरचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे,गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे,माजी आमदार पोपटराव गावडे,पं स.सदस्य डाँ.सुभाष पोकळे,केंद्रप्रमुख रामदास बोरूडे व सर्व शिक्षक बंधू भगिनिंनी कविवर्य दत्तात्रय जगताप यांचे अभिनंदन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *