मांडवगण फराटा येथील रक्तदान शिबीरात ११५ जणांचे रक्तदान – गणेश घाटे या तरुणाला उपचारासाठी शुभम दादा युथ फौंडेशन कडून ५००० हजार रुपयांची मदत

384

       शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा येथील शंभूराजे प्रतिष्ठाण मांडवगण फराटा व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २६जानेवारी निमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे हे ६ वे वर्ष असून यामध्ये ११५ जणांनी सहभाग घेत रक्तदान केले.

शिबीर यशस्वी पार पडण्यासाठी शंभूराजे प्रतिष्ठाणचे मनोहर फराटे,संदिप जगदाळे,योगेश फराटे,समिर पवार,दत्तात्रय गायकवाड,शहारुख सय्यद,रुषी सकुंडे,अमित हांडे,अभिजीत शेलार,आकाश सुर्यवंशी,अभिजीत फराटे,विकास फराटे यांनी प्रयत्न केले.यावेळी दादापाटील फराटे,राजेंद्र गदादे,मचिंद्र गदादे,सुभाष पाटील,पिंटू पाटील,महादाभाऊ फराटे,सुधीर फराटे,संतोष फराटे,नवनाथ फराटे सुधीर मचाले,सागर फराटे,गोरक्षशितोळे,मोरेसर यांनी शिबीरास भेट दिली.ससूनचे समाजसेवेचे डाँ अरुण बरडे यांनी शंभूराजे प्रतिष्ठाणचे कमी वेळेत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान दिल्याबद्दल कैतुक केले. तर गणेश घाटे याच्या किडणीच्या आँपरेशनसाठी तांदळी येथीलध्यास अखंड समाजसेवेचा घेतलेल्या कै.शुभम गदादे फाउंडेशनच्या वतीने गणेशला उपचारासाठी  ५००० रुपयांची मदत देण्यात आली. संतोष परदेशी सर यांनी प्रस्तावना केली व मनोहर फराटे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *