शिक्रापूर,पुणे : पोलीस ठाण्यात अपंगाना विशेष सेवा देण्यात यावी, प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष किसन फंड यांची मागणी

436

             शिक्रापूर,पुणे : जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अपंगांना तक्रारी देण्यास जाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यासाठी पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अपंगांसाठी रॅम्प अथवा लिफ्टची व्यवस्था करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किसन फंड यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे.

              अपंग व्यक्तींना पोलीस स्टेशनमध्ये काही निमित्त जावे लागते, काही ठिकाणी पोलीस स्टेशन वरील मजल्यावर देखील आहे, कित्येक ठिकाणी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढ, उतार करण्यासाठी अपंगांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे पोलीस स्टेशनला अपंगांसाठी रॅम्प अथवा लिफ्टची व्यवस्था करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किसन फंड यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची नुकतीच भेट घेतली, यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अपंगांसाठी विशेष दिवस नेमण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली, यावेळी संदीप पाटील यांना निवेदन देखील देण्यात आले. तर याबाबत बोलताना अपंगांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईन तसेच अपंगांना पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष सेवा देण्यात येतील असे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना अपंगांना विशेष सेवा मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विशेष प्रयत्न करणार असल्याचे किसन फंड यांनी सांगितले.

– प्रतिनिधी,शेरखान शेख,(सा.समाजशील,शिक्रापूर)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *