समृद्धी धनाजी गावडे ९०.३० टक्के मिळवत विद्यालयात प्रथम

344

शिक्रापूर,ता.शिरूर (-प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) : पाबळ ता. शिरूर येथील श्री भैरवनाथ विद्यामंदिरातील बारावी शास्त्र शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून, यामध्ये समृद्धी धनाजी गावडे या विद्यार्थीनीने ९०.३० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे.शास्त्र शाखा द्वितीय क्रमांक वैभव राऊत ८८.१५ टक्के, आकांक्षा पिंगळे ८७.६९, कला शाखेमध्ये प्रतिज्ञा साकोरे ८१.५३ ,अश्विनी  पानसरे ८० टक्के, भाग्यश्री झोडगे ७४.६१ टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. तर वाणिज्य शाखेमध्ये प्रतिक्षा शिंदे ८६.३० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. शीतल जाधव ८५.५ टक्के, अभिषेक थिटे ८४.६१ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. एम.सी.व्ही.सी शाखेमध्ये प्रतीक्षा डोके ७७.६१, सुदर्शन कारले ७२.२० टक्के व प्रतीक रेटवडे ७१.०८टक्के गुण मिळवत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर, सचिव योगेश चौधरी, खजिनदार सोपान जाधव जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे व पदाधिकारी यानी अभिनंदन केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *