शिक्रापूर मध्ये सोमवार पासून ४ दिवस कडक लॉकडाऊन

474

शिक्रापूर,ता.शिरूर (-प्रतिनिधी,राजाराम गायकवाड, समाजशील वृत्तसेवा) : शिरूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची लोकसंख्या दिवसेंदिवसवाढत असल्याने  शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे २० ते २४ जुलै दरम्यान चार दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. शिरुर तालुक्यात करोनाने कहर मांडला असुन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे येथील प्रशासनाने संपूर्ण शिक्रापूर गावात २० ते २४ तारखेपर्यंत कडक लाँकडाऊन जाहिर केला असुन नागरिकांनी त्याचे पूर्णपणे पालन करावे तसेच गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रांताधिकारी संजयकुमार देशमुख यांच्या आदेशानुसार हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. शिक्रापूर ग्रांमपंचायत व व्यापारी आसोशिएशन यांच्या सहमताने २१ ते २४ या दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात आले असून सर्व व्यापारी या पूर्णपणे पालन करणार असल्याची माहिती व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष अशोक शहाणे यांनी समाजशील शी बोलताना दिली. यांनतर २५ ते २९ या दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने ८ ते १२ या वेळेत उघडली जातील. लॉकडाऊन च्या काळात मेडिकल ची दुकाने पुर्णपणे सुरु राहतील. या भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असुन येथे पुढे नागरिकांनी जास्त प्रमाणात काळजी घ्यावी शासनाने दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करावे असे आवाहान प्रांताधिकारी संजयकुमार देशमुख व व्यापारी असोशिएशन ने केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *