संकटकाळात धावून जाणाऱ्या नेत्याचा कोरोनाने घेतला बळी 

388

नारायणगाव,ता.जुन्नर (-प्रतिनिधी,अतुल कांकरिया) : जुन्नर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमानगटनेते दिनेश (भैय्या) किसन दुबे (वय-५७) यांचे आज रविवार (दि. १९) पहाटे पुणे येथे खासगी रुग्णालयात कोरोना उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील करोना बळींची संख्या सात झाली, असून जुन्नर शहरातील हा दुसरा बळी आहे. दिनेश दुबे हे जुन्नर नगर परिषदेचे  राष्ट्रवादीचे विद्यमान गटनेते व जेष्ठ नगरसेवक होते. चार दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते त्यामुळे त्यांना तात्काळ पुण्यातील हडपसर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट केले होते. सर्वांसाठी संकटकाळात धावून जाणारा नेता अशी ओळख असलेले दिनेश भैय्या या नावाने सर्वांना परिचित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वल्लभ बेनके यांचे कट्टर समर्थक व आमदार अतुल बेनके यांचे जुन्नर शहरातील विश्वासू सहकारी होते. दुबे हे राजकीय-सामाजिक क्षेत्रात तीस दशकापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या दुबे यांनी सार्वजनिक जीवनात एकही निवडणुकीत हार पत्करली नव्हती. त्यांच्या निधनाने जुन्नर शहर व तालुक्यात  हळहळ व्यक्त केली जात आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *