(संग्रहित छायाचित्र)  

मोरोशी वन विभागाच्या वनपालास मारहाण प्रकरणी जंगलतोड प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

1142
           मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) – देशभर सुरु असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत असताना याचा फायदा काही लोक घेताना दिसत असून अशीच जंगल तोड रोखणाऱ्या  मुरबाड तालुक्यातील मोरोशी वनपरिक्षेत्र महिला वनपालास मारहाण झाल्याने टोकावडे पोलीस ठाण्यात तीघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत  सविस्तर वृत्त असे कि, टोकावडे वनक्षेत्र अधिपत्याखाली दक्षिण भागातील बीट वनपाल जयश्री भला ह्या कर्तव्य बजावत आसतांना आपल्या विभागातील  वनभागात गस्त घालत असताना जंगलामध्ये कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर कोणीही वनाधिकारी येणार नाही असे समजून ज्ञानेश्वर पिल्लू वाख, बाळू पिल्लू वाख, गिरीराज पिल्लू वाख, या तिघा जणांनी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली होती.
    त्या सर्वांना वृक्ष तोडू नका असे सांगण्यास गेलेल्या मोरोशी बीट वनपाल जयश्री भला यांना त्या तिघांकडुन मारहाण करण्यात आली. त्याच बरोबर भांडण झाले आहे असे समजल्यानंतर येथील  काही महिलांनी देखील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याबाबत या तिघांविरोधात टोकावडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  पुढील तपास टोकावडे पोलीस करत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *