मुरबाडमध्ये अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थी व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांनाच फक्त पाच किलो तांदूळ मोफत

695
         मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) –  गेले दोन तीन दिवस मुरबाड शहरात रेशन दुकानात लागणाऱ्या रांगा व ग्रामीण भागात रेशन दुकानात गैर समजूती तुन होणारी  भांडणे व सोशल मीडियाच्या माध्यमतून पसरलेले गैरसमज टाळण्यासाठी मुरबाड तहसिलदार अमोल कदम यांनी शासनाने सुरू केलेली योजना फक्त अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थी तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांनाच लागु आहे त्यांना फक्त पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहेत असा खुलासा केला आहे.
       स्वस्त धान्य दुकाना मार्फत मिळणारे रेशन , तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण निधी मधून मिळणारे पाच किलो प्रतिव्यक्ती तांदूळ हे सध्यातरी अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थी तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांनाच लागु  आहे.( पूर्वीपासून ज्यांना रेशन मिळते आहे त्यांनाच ) जे केशरी  शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना अजून तरी स्वस्त धान्य दुकाना मार्फत रेशन धान्य लागू नाही. शासनाकडून याबाबत केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन देण्याचे आदेश प्राप्त होताच त्यांना रेशन धान्य तात्काळ देण्यात येईल येईल तोपर्यंत रेशन दुकानदारांना रेशन देणेबाबत आग्रह करू नये. अशी विनंती तहसिलदार कार्यालय मुरबाड यांचे तर्फे करण्यात आली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *