मुरबाड पोलिसांची गावठी दारू हातभट्टी वर कारवाई, हजारो रुपये किमतीचा माल जप्त  

550
          मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) – मुरबाड पासून चार किमी अंतरावर असणाऱ्या खाटेघर गावच्या जंगलात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार केलेल्या कारवाईत मुरबाड पोलिसांना यश लाभलं असून या कारवाई ६४  हजार रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  याबाबत मुरबाड पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरबाड तालुक्यातील गावागावात असणारे बिअर शॉप व मुरबाड शहरातील एकमेव वाईन शॉप व देशी दारू दुकान बंद असल्याने तालुक्यात असणाऱ्या मोहाच्या फुला वर प्रक्रिया करून गावठी दारू बनविण्यात येत आहे तालुक्यातील अनेक गावांत सध्या हातभट्टी सुरू असल्याची चर्चा असताना होम क्वारंटाईन साठी गस्ती घालताना खाटेघर येथे ही हातभट्टी मिळून आली.
        गावागावात गुटखा व दारूसाठी लोकांची तळमळ चालू असताना याचा फायदा काही हातभट्टी धारक घेताना दिसत आहेत.  दारू विरोधात पोलीस पाटील ही सज्ज असताना तालुक्यातील पारगाव येथील पोलीस पाटील याने दारू पकडून देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला उलटा चोर कोतवाल को दाटे अशी परिस्थिती पोलीस ठाण्यातून अनुभवायला आली असल्याचे सांगितले. त्यामुळे अनेक पोलीस पाटलांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच हातभट्टी फोफावत असल्याचे दिसून येत आहे. मुरबाड पोलिसांच्या या कारवाई मुळे हातभट्टी वाल्यांचे धाबे जरी दणाणले असले तरी गावठी दारूचे मोठे आवाहन मुरबाड पोलिसांपुढे आहे. सदर कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी मुरबाड बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलिसांनी केली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *