एस एस जी पी प्रोडक्शन,गर्जा कलामंच मुरबाडच्या माध्यमातून तालुक्यातील १०१ गरजू कुटुंबाना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  

807
          मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे)  – संपूर्ण देश कोरोना सारख्या विषाणूशी लढत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉक डाउन व संचार बंदी लागू करून जवळ पास दहा दिवस उलटून गेले आहेत. सार काही बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या, मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन  आपली सामाजिक बांधिलकी जपत एस एस जी पी प्रोडक्शनचे संचालक प्रफुल्ल मोरे यांच्या संकल्पनेतून व गर्जा कलामंच मुरबाडच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील १०१ गरजू कुटुंबाना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
          या प्रसंगी  मुरबाड पोलीस स्टेशनचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, जेष्ठ पत्रकार मंगल डोंगरे, गर्जा कलामंच मुरबाडचे संस्थापक अध्यक्ष नितेश डोंगरे, तसेच संपूर्ण गर्जा कलामंच टीम उपस्थित होती. जनसामान्यात कोरोना विषाणुंची जनजागृती करत मुरबाड शहर परिसरातील गोऱ्याचा पाडा, बागेश्वरी कातकरीवाडी, कुशाची वाडी,  सुरेश नाना तेलवणे यांची. विटभट्टी वरील मजुर,नागाचा खडक, म्हाडा कातकरी वस्ती, तसेच मुरबाड परिसरात हे साहित्य वाटप करण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *