वडगाव शेरी,पुणे : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या कारवाई चा वडगाव शेरीत जल्लोष, शिवसेना वडगावशेरी विधानसभा समन्वयक,संघटिका अमृतताई पठारे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन

584
          वडगाव शेरी,पुणे : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या कारवाई चा वडगाव शेरीत आज उत्स्फूर्त  जल्लोष करण्यात आला आहे. शिवसेना वडगावशेरी विधानसभा समन्वयक,संघटिका अमृतताई पठारे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी “भारत माता की जय” च्या घोषणा देत आज भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हददीत जाऊन केलेल्या धडक कारवाईचे शिवसेना महिला आघाडी वाडगावशेरी पुणे विधानसभा येथील महिला आघाडीने जल्लोष साजरा केला
शिवसेना वडगावशेरी विधानसभा समन्वयक,संघटिका अमृतताई पठारे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते.
         पाकिस्तान मध्ये घुसून आपल्या भारतातील हवाई दल सेनेने दहशतवादी संघटनाच्या अतिरेकी अड्ड्यांवर हल्ला चढवत पाकिस्तानातील शेकडो दहशतवादी अतिरेकी ठार करत त्यांचे तळ देखील उद्वस्वत केले आहेत पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात आपले 44 जवान शाहिद झाले होते.
          त्याचा बदला म्हणून भारतीय वायू सेनेने आज पहाटे एअर स्ट्राइक करून ही मोठी कारवाई केली. त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती अमृत पाठारे यांनी सा. समाजशीलशी  बोलताना दिली.
भारतीय वायसेनेने उत्कृष्ठ कामगिरी केल्याने वडगाव शेरीत वायुसेना दलाचे अभिनंदन व जल्लोष साखर वाटून, फटाके वाजवुन,करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या वडगावशेरी विधानसभा समन्वयक,संघटिका अमृतताई पठारे, वाडगावशेरी शहर संघटक राजाभाऊ चौधरी ,विभाग प्रमुख विनोद पऱ्हाड,उप विभाग संघटिका शारदा मठपती, शाखा प्रमुख रेखा गायकवाड,सविता देवकर,सुनीता पवार,रोहिणी टकले,शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
-देवकीनंदन शेटे,(संपादक,समाजशील न्यूज)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *