बंदच्या काळात शिक्रापुरात किराणा मालाचे गोडाऊन फोडले – सुमारे एक लाख अंशी हजारांचा ऐवज लंपास 

546

  शिक्रापूर,शिरुर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड)  – पुणे – अहमदनगर राज्यमार्गावरील शिक्रापूर मध्ये अज्ञात चोरटयांनी एका  गोडाऊन फोडुन  १लाख ७८ हजार रुपये किमतीचा माल लंपास केला.यामध्ये चोरट्यांनी सी सी टिव्ही काँमेरा यांच्या वायरी तोडुन चोरी केली.या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अक्षय भुजबळ यांचे पाबळ चौकामध्ये व्ही मार्ट हे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. २४ मार्च ला गोडावुन बंद करुन भुजबळ घरी गेले .२५ ला लाँकडाऊन होते. २६ तारखेला गोडाऊन ला चक्कर मारत असताना पञा उचकटलेला दिसला. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गोडाऊन मध्ये जाऊन पाहणी केली.गोडाऊन मधील तेल, साबण,बदाम, मनुखे, काजु, गायछाप, यांच्या सह सी सी टि व्ही, सुट्टे पाच हजार रुपये असा एकुण सुमारे १लाख ७८ हजाराचा माल चोरीला गेला. संचारबंदी व लाँकडाऊन काळात चोऱ्या वाढल्याने नागरिकात आता दुहेरी भिती निर्माण झाली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *