खाजगी डॉक्टरांना शासनाच्या वतीने विनामुल्य सेफ्टी किटचा तात्काळ पुरवठा करावा – मनसेचे नरेश देसले यांची मागणी 

458
           मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – खाजगी डॉक्टराना शासनाच्या वतीने विनामूल्य प्रोटेक्शन किटचा तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी मुरबाड मनसे चे शहराध्यक्ष नरेश देसले यांनी तहसीलदार अमोल कदम यांना ऑनलाईन पत्र देऊन वरिष्ठ पातळी हुन याची अंमलबजावणी व्हावी अशी केली आहे. त्याच बरोबर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ट्विटर या समाज माध्यमाद्वारे निवेदन सुपुर्द करण्यात आले आहे. राज्यातील शहर व ग्रामीण भागामध्ये बहुतांशी खाजगी दवाखाने कोरोना प्रादुर्भाव होईल या भीतीने बंद करण्यात आले होते परंतु सरकारच्या आदेशामुळे ते पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
         याबाबत खाजगी डॉक्टरांशी चर्चा केली असता असे लक्षात आले की,कोरोना  प्रादुर्भाव होऊ  नये म्हणुन असलेल्या प्रोटेक्शन किटच्या अभावी सदर खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते . देशाची राजधानी दिल्ली येथे मोहल्ला क्लिनिक मध्ये एक डाॅक्टर कोरोना बाधित आढळला सदरच्या प्रकारामुळे त्यांनी हाताळलेल्या बाह्यरुग्ण कक्ष मधील मागील १० दिवसापासुनच्या रुग्णांची तपासणी सुरू केली आहे त्यामुळे असा प्रकार जर राज्यामध्ये झाला तर मोठी हानी होवु शकते. कळत नकळत जरी एखादा डॉक्टर दुर्दैवाने कोरोना व्हायरस बाधीत झाला तर तो हजारो रुग्णांना बाधीत करु शकतो.  त्यामुळे खाजगी डॉक्टरांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे सरकारने जर याबाबत योग्य ती दखल घेऊन खाजगी डॉक्टरांना शासनाच्या वतीने विनामुल्य प्रोटेक्शन किट पुरविण्याची सोय केली तर सदर डॉक्टर विशेषत: ठाणे जिल्ह्यातील रुग्णांची सेवा बिनधास्तपणे करु शकतील असे या निवेदनात म्हटले आहे. मात्र खाजगी डॉक्टरांनी आपली क्लीनिक भीतीने बंद केल्याने नेहमीच्या रुग्णांना जनजागृती करणे गरजेचे असताना बंद करणे पसंत केले. अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टरच भीतीने क्लीनिक बंद करून गेल्याने सर्वाना शासकीय यंत्रणेवर अवलंबून रहावे लागले. मात्र आपणही समाजाचे काही देणे लागतो अस समजून म्हणून निदान जनजागृती साठी प्रयत्न न करता क्लीनिक बंद ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.  मात्र त्यांची ही भीती पहाता मुरबाड मनसे व काँग्रेसने त्यांना सुरक्षा किट मोफत मिळावे या साठी प्रयत्न सुरू केले आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *