राष्ट्रीय पक्षी मोराचा दुर्दैवी मृत्यू – कवठे येमाईच्या गणेशनगर परिसरातील घटना 

695
            कवठे येमाई ता.शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या एका अंदाजे २ वर्ष वयाच्या मोराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या गणेशनगर परिसरातील खारओढ्या नजीकच्या शेताच्या कडेला काही शेतक-यांना एक मोर मृतावस्थेत पडला असल्याचे आज पाहावयास मिळाले. त्याची दुर्गंधी सुटली असल्याने याबाबत स्थानिक नागरिकांनी शिरूर वनविभागाला याची माहिती दिली.
      घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वनरक्षक सविता चव्हाण, हनुमंत कारकूड व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी करीत पंचनामा केला.बहुधा २ ते ३ दिवसांपूर्वी हा मोर मृत्युमुखी पडला असावा असा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. त्याची दुर्गंधी सुटल्याने लगेचच त्याचा अंत्यविधी करण्यात आला.या परिसरात तुरळक मोर असल्याचे व शेतकऱ्यांना त्यांचा कुठलाच त्रास नसल्याने ह्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *