शिरूर-आंबेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भीमाशंकर साखर कारखान्याकडून सॅनिटायझर व मास्क

530
      कवठे येमाई ता.शिरूर : (देवकीनंदन शेटे,संपादक) – सध्याची कोरोना विषाणूची दाहकता पाहता रुग्णांना सेवा देणा-या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे आरोग्य या विषाणूपासून संरक्षित रहावे म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शिरूर आंबेगाव – विधानसभा मतदार संघामधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे कोरोना विषाणुपासून प्रतिबंध व्हावा यासाठी हॅन्ड सॅनिटायझर व मास्क आज देण्यात आले.
   हे हॅन्ड सॅनिटायझर व मास्क शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे येमाई व टाकळी हाजी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी घोडगंगा सहकारि साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे, डॉ प्रदीप बिक्कड व कर्मचारी उपस्थित होते.तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य टी खबरदारी घ्यावी व लॉकडाऊन असेपर्यंत घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन माजी आमदार गावडे यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *